आदित्य ठाकरे रविवारी परभणी दौऱ्यावर
परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १० वाजता ते परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण शिवारात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी कर
Q


परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १० वाजता ते परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण शिवारात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क नेते आमदार अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. टाकळी कुंभकर्ण येथील पाहणीनंतर दुपारी १२ वाजता आदित्य ठाकरे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परभणी लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे व आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande