अंबाजोगाई येथील घरफोडी प्रकरणी आरोपीस अटक करुन मुद्देमाल हस्तगत
बीड, 27 सप्टेंबर (हिं.स.) - पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे शहरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यानुसार या घरफोडीतील आरोपीचा तपास करत घरफोडी करणाऱ्या आरोपीस बीड तसेच अंबाजोगाई येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पायहक्काने मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांच्य
पोलीस कारवाई


बीड, 27 सप्टेंबर (हिं.स.) - पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे शहरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यानुसार या घरफोडीतील आरोपीचा तपास करत घरफोडी करणाऱ्या आरोपीस बीड तसेच अंबाजोगाई येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पायहक्काने मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडील 53 तोळे सोने व चांदी ताब्यात घेतली आहे. राहते घराला कुलूप लावुन बाहेरगावी गेल असता त्याचे बंद घराचा दरवाजा तोडुन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन सोन्याचे दागीणे 53 तोळे, चांदीचे दागीणे पावने दोन किलो चांदी व नगदी रक्कम चोरल्याच्या तक्रारीवरून गु.र.नं 391/2026 कलम 331(3), 331(4), 3(5) बी.एन.एस अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घरफोडीची घटना घडल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्था.गु.शा बीड यांनी घटनास्थळी भेट दिली होती. सदरील घरफोडीचे प्रकारानुसार अभिलेखवरील आरोपीची माहीती घेतली, जवळपास परीसरातील 50 पेक्षा जास्त सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एका सिसिटिव्ही मध्ये तीन संशयीत आरोपी दुचाकी वर जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदरील गुन्हा हा अमर काकासाहेब थोरात व त्याचे ईतर दोन साथीदार यांनी मिळुन केला आहे. त्यानी चोरी केलेले सोने विक्रीसाठी घेवुन जाणार आहे. त्यावरुन परळी परीसरात पोलीसांचा सापळा रचण्यात आला व अमर काकासाहेब थोरात यास मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. त्यास पकडुन ईतर साथीदाराचे नांव विचारले असता त्याने जगजितसिंग अचलसिंग दुधानी असे सांगीतले. दुधानी यास देखील लागलीच माहीती घेवुन पकडण्यात आले. सदरील गुन्हा करण्यात करीता त्याचे सोबत मंगलसिंग बावरी हा देखील होता व त्याची युनिकॉर्न मोटार सायकल वापरल्याचे तपासात सांगीतले. व त्या तिघांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. मंगलसिंग बावरी सध्या गुन्हयात फरार आहे. त्याचा शोध अंबाजोगाई शहर पोलीस घेत आहेत. सदरील आरोपीकडुन गुन्हयातील 27 तोळे (270 ग्रॅम) सोने व 858 ग्रॅम चांदी चे दागीणे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीनामे अमर काकासाहेब थोरात, वय 23 वर्ष, रा क्रांतीनगर अंबाजोगाई, जगजीतसिंग अचलसिंग दुधानी, वय 32 वर्ष, रा शिवाजी चौक, परळी 3. मंगलसिंग हिरासिंग बावरी (फरार), यांना वरील गुन्हयात निष्पन्न करुन व ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर हे करीत आहेत. सदरील कामगिरी ही नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजागाई, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बीड, ऋषिकेश शिंदे, सहा. पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शरद जोगदंड (पोलिस निरीक्षक अंबाजोगाई शहर), उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अश्वीनकुमार सुरवसे, गोविंद राख, चालक अतुल हराळे, तसेच पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथील अंमलदार तेजस व्हावळे,सुशांत गायकवाड पांडुरंग काळे व हनुमंत चादर यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपस पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत. पोलिसांनी अल्पावधीतच केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande