होर्मुझच्या नाकेबंदीमुळे इराण अडचणीत? ट्रम्प यांचा मोठा दावा
वॉशिंग्टन , 27 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने पुन्हा खुली करायची आहे. कारण हा जलमार्ग बंद केल्यामुळे इराणवर मोठा आर्थिक दबाव निर्माण
होर्मुझच्या नाकेबंदीमुळे इराण अडचणीत? ट्रम्प यांचा मोठा दावा


वॉशिंग्टन , 27 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने पुन्हा खुली करायची आहे. कारण हा जलमार्ग बंद केल्यामुळे इराणवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला आहे. ट्रम्प म्हणाले की, हा सामरिक जलमार्ग बंद करण्याचा निर्णय इराणसाठीच नुकसानकारक ठरला असून, या निर्णयामुळे इराण स्वतःच अडचणीत सापडला आहे.

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “ते अडचणीत आहेत. का? कारण त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांच्याकडे पैसा येत नाही.” होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीमुळे इराणला आर्थिक फायदा मिळतो आणि हा जलमार्ग बंद करण्याच्या निर्णयामुळे त्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, जगासाठी अडचणी निर्माण करण्याच्या उद्देशाने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने त्यांच्या शब्दांत, “लष्करी इतिहासातील सर्वात मोठी नाकेबंदी” लागू केली. या व्यवस्थेअंतर्गत इतर देशांना या जलमार्गाचा वापर करण्याची परवानगी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, यामुळे इराणवरील दबाव वाढला आहे.

ट्रम्प यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा खुली करण्यासाठी आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबत चर्चा सुरू करण्यासाठी तीन अटींसह सात दिवसांचा रोडमॅप प्रस्तावित केला होता. अहवालानुसार, इराणने यासाठी अमेरिकेने आपली नौदल नाकेबंदी हटवावी, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंधांमध्ये सवलत द्यावी आणि लेबनॉनचा समावेश असलेल्या युद्धविरामाचे पालन करावे, अशी मागणी केली होती. मात्र, ट्रम्प यांनी इराणचा हा प्रस्ताव फेटाळून लावला.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, तेहरानने सात दिवसांच्या रोडमॅपबाबत ट्रम्प यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. मात्र, मध्यस्थामार्फत अमेरिकेकडून अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर मिळालेले नाही. अराघची यांच्या म्हणण्यानुसार, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत इराणच्या अटींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या अटी पूर्ण झाल्यानंतरच जलमार्ग पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.अराघची यांनी सांगितले की, इराण मध्यस्थांमार्फत अमेरिकेच्या अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा करत आहे. ते म्हणाले, “आमच्या अटी स्पष्ट आहेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल या अटी पूर्ण होण्यावरच अवलंबून असेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande