मुंबई ते मेलबर्न… माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात
मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)। माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे आणि तिच्या या नव्या प्रवासाची उत्सुकता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. जगभरातील चाहत्या
Madhuri


मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)। माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे आणि तिच्या या नव्या प्रवासाची उत्सुकता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. जगभरातील चाहत्यांकडून सोनी मराठीला प्रेम आणि उत्साहाने भरलेल्या प्रतिक्रिया मिळत असून, माधुरीला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

सोनी मराठीच्या नव्या प्रोमोमधून हा जागतिक उत्साह पाहायला मिळतो. सिंगापूर, दुबई आणि मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील चाहत्यांच्या खास प्रतिक्रिया या प्रोमोमध्ये पाहायला मिळतात. माधुरीने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे आणि तिच्याशी जोडलेली हीच आपुलकी आजही जगभरातील चाहत्यांमध्ये कायम असल्याचं या प्रतिक्रियांमधून दिसून येतं.

मुंबईपासून मेलबर्नपर्यंत, दुबईपासून सिंगापूरपर्यंत माधुरीची लोकप्रियता देशाच्या सीमा ओलांडून पोहोचली आहे. अनेक पिढ्यांनी माधुरीला पाहत तिच्या अभिनयाचा आनंद घेतला आहे आणि आता ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून तिचा हा नवा प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आता या प्रेमाला मिळणार आहे ‘कोण होणार करोडपती’च्या खेळाची रोमांचक जोड. माधुरीची सहजता, आपुलकी आणि तिची खास शैली यामुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा नवा अध्याय आणखी खास होणार आहे. ज्ञान, स्वप्नं, भावनांचा प्रवास आणि खेळाचा थरार यांचा अनोखा संगम या पर्वातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘कोण होणार करोडपती’ १२ ऑक्टोबर २०२६ पासून, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर!

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande