बॉक्स ऑफिसवर सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’चा जलवा
मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या ‘द वन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी कमाईत चांगली वाढ नोंदवली आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने रविवारी १४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपट
SIDDHARTH TAMANNAAHS THE ONE BOX OFFICE COLLECTION


मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या ‘द वन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी कमाईत चांगली वाढ नोंदवली आहे.

सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने रविवारी १४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने ८ कोटी, तर दुसऱ्या दिवशी ११.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यामुळे तीन दिवसांत चित्रपटाची भारतातील नेट कमाई ३३.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर जगभरात चित्रपटाने ४३.१५ कोटी रुपयांचा ग्रॉस व्यवसाय केला असून, तो आता ५० कोटी रुपयांच्या आकड्याच्या जवळ पोहोचला आहे. या चित्रपटात सुनील ग्रोवर, मनीष पॉल आणि श्वेता तिवारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दुसरीकडे, नानीच्या ‘द पॅराडाईज’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरीही सुरू आहे. चित्रपटाने रविवारी चौथ्या दिवशी सर्व भाषांमध्ये १५.७० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सुरुवातीच्या तीन दिवसांतील ६४.८० कोटी रुपयांच्या कमाईसह चित्रपटाची भारतातील नेट कमाई आता ८०.५० कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता १०० कोटी रुपयांच्या आकड्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जगभरात ‘द पॅराडाईज’ने आतापर्यंत १३८.२५ कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केला आहे. या चित्रपटात नानीसोबत राघव जुयाल, मोहन बाबू आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande