
परभणी, 29 सप्टेंबर, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघांची द्वैवार्षिक निवडणूक साठीचा कार्यक्रम घोषित केला आहे. परभणी जिल्ह्याकरिता दि. 22 सप्टेंबर, 2026 ते 31 ऑक्टोबर, 2026 पर्यंत आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
05- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक - 2026 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामांसाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूक संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभने दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक असल्याणे जिल्हादंडाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन या आदेशाव्दारे शासकीय कार्यालय, विश्राम गृह परिसरात सदर कृती करण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत (दि. 31 ऑक्टोबर, 2026) निर्बंध घातले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis