बीड - स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची 134 कोटी 57 लाखांची आर्थिक उलाढाल
बीड, 29 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख समृद्ध करत स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात मार्च 2026 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला
बाजीराव धर्माधिकारी


बीड, 29 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख समृद्ध करत स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात मार्च 2026 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. 134 कोटी 57 लाखांचीआर्थिक उलाढाल तर 54 लाख 76 हजार निव्वळ नफा असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी सरत्या आर्थिक वर्षातील मार्च 2026 अखेर चा ताळेबंद सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2026 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.

विशेष म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी- 45 कोटी 67 लाख,,कर्ज 38 कोटी 69 लाख, गुंतवणूक 15 कोटी 74 लाख, आर्थिक उलाढाल134 कोटी 57 लाख, राखीव निधी 9 कोटी 23 लाख,भाग भांडवल-67 लाख 13 हजार ,खेळते भांडवल-56 कोटी 30 लाख ,निव्वळ नफा 54 लाख 76 हजार, सीडी रेशो 64.03% तर लाभांश 10% इतका आहे. पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांचा विश्वास हेच पाठबळ आहे असे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. यापुढेही हा विश्वास सार्थ ठरवून वाटचाल करु अशी ग्वाही पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे, राजाभाऊ मराठे, दशरथ होळकर, डॉ. सौ. श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती. संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी यांनी वार्षिक आहवाल सभेसमोर मांडला.या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयसूचीनुसार चर्चा करण्यात आली. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande