नाशकात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
नाशिक, 29 सप्टेंबर, (हिं.स.)। द्राक्षाची पंढरी म्हणून आणि कॉलिफॉर्निया अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उत्तर पूर्व या भागामध्ये विविध सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतु रायते यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे चांगली
Grape farmers commit


नाशिक, 29 सप्टेंबर, (हिं.स.)। द्राक्षाची पंढरी म्हणून आणि कॉलिफॉर्निया अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उत्तर पूर्व या भागामध्ये विविध सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतु रायते यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून द्राक्षाच्या हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जबाजारीपणामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी चिंतेच्या छायेखाली आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, द्राक्षाची पंढरी असलेल्या निफाड तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये द्राक्ष उत्पादनासाठी खडक माळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी तथा या भागातील सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतू कचरू रायते ( 57) यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सातत्याने शेतीतील आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौक माहितीनुसार समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका हा सजन तालुका म्हणून ओळखला जातो पण मागील काही महिन्यांपासून या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती हा तालुका दुष्काळी ग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला नव्हता त्याचाही परिणाम झाल्याचे या भागातील शेतकरी सांगत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande