
मनपाची मुदतवाढीची मागणी फेटाळल्याने झटका
नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)। नाशिक महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया ही पुढील सहा आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महानगरपालिकेला दिले आहे महानगरपालिकेची मुदत वाढीची मागणी न्यायालयाने फेटाळल्यामुळे महापालिकेला मोठा दणका बसला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन आठ महिन्याच्या कालावधी उलटून गेला आहे तरीही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने काँग्रेसचे नगरसेवक सुपी जीन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर आज मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. ही याचिका दाखल झाल्यानंतर गेल्या आठवड्यात मनपायुक्त मनिषा कचरे यांनी सर्व गट नेत्यांची बैठक घेऊन सदस्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर अटी आणि पत्र्याचे बाबतची माहिती सांगितली होती तर सत्ताधारी भाजपाला ही निवडणूक अजून काही कालावधीसाठी लांबीवर पडणे आवश्यक असल्याने त्या दृष्टिकोनातून प्रयत्नही होत होते त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने आज मुंबई उच्च न्यायालयात चार महिन्याची मुदत मागितली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने आज याबाबत निकाल देताना सांगितले की , स्वीकृत नगरसेवकांची पदे सहा आठवड्यांत भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला दिले आहेत. आज झालेल्या सुनावणीत मनपा प्रशासनाने नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी चार महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत महापालिका प्रशासनाला फटकारले. न्यायालयीन निर्णयामुळे सात ते आठ महिन्यांपासून रखडलेल्या १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग आता निश्चित कालमर्यादेत पुढे जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI