समन्वयातून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावी करा : सीईओ नतिशा माथूर
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी दिले.जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य स
समन्वयातून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावी करा : सीईओ नतिशा माथूर


परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी दिले.जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, आयुक्त आरोग्य सेवा संजय काटकर आणि शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांच्या निर्देशानुसार, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यशाळेची सुरुवात झाली. नॉलेज लिंक स्टेट प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमच्या अभियानातील स्नेहा गवई आणि प्रीती बगमारे यांनी ग्रामस्तरावरील उपक्रम, तालुकानिहाय कार्यक्रमांचे सादरीकरण आणि विविध विभागांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश शिंदे यांनी अभियानात आरोग्य विभागासह नागरिकांचा सक्रिय सहभाग, लोकसहभाग आणि वर्तणूक बदलाचे महत्त्व स्पष्ट केले. सेलूचे गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी सेलू तालुक्यात अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचे आणि कृती आराखड्याचे प्रतिनिधिक स्वरूपात सादरीकरण केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील गटविकास अधिकारी नारायण इंगळे, एम. पी. कदम, पी. एम. जाधव, शिवाजी काळे, मानकर, जल जीवन मिशनचे जयंत गाडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) संजय ससाने, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा व तालुका समूह संघटक, ग्रामपंचायत अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विस्तार व माध्यम अधिकारी जयश्री दिपके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमित बिडवे, जिल्हा मूल्यमापन अधिकारी क्षीरसागर आणि विविध कार्यक्रम समन्वयकांचाही सहभाग होता. ‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ या तत्त्वावर आधारित महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून ङ्गमाझं गाव आरोग्य संपन्न गावफ हे अभियान सुरू केले आहे. गावोगावी आरोग्य सेवा अधिक बळकट करणे, नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि अभियानाची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचविणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. परभणी जिल्ह्याला निरोगी, सक्षम, जागरूक आणि सशक्त बनविण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटी अभियानाची गावोगावी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande