एसबीआय म्युच्युअल फंडकडून एसबीआय निफ्टी200 व्हॅल्यू 30 ईटीएफ एफओएफ लाँच
मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड संस्थांपैकी एक असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडने एसबीआय निफ्टी200 व्हॅल्यू 30 ईटीएफ एफओएफ ही योजना लाँच केली आहे. ही ओपन-एंडेड फंड ऑफ फंड योजना असून, या योजनेत एसबीआय निफ्टी200 व्हॅल
SBI Mutual Fund Launches SBI Nifty200 Value 30 ETF FOF


मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड संस्थांपैकी एक असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडने एसबीआय निफ्टी200 व्हॅल्यू 30 ईटीएफ एफओएफ ही योजना लाँच केली आहे. ही ओपन-एंडेड फंड ऑफ फंड योजना असून, या योजनेत एसबीआय निफ्टी200 व्हॅल्यू 30 ईटीएफ मध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेची नवीन फंड ऑफर (एनएफओ) 17 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत खुली आहे.

या योजनेचा गुंतवणूक उद्देश एसबीआय निफ्टी200 व्हॅल्यू 30 ईटीएफकडून मिळणाऱ्या परताव्याशी जवळपास सुसंगत परतावा मिळवून देण्याचा आहे. मात्र, योजनेचा गुंतवणूक उद्देश साध्य होईलच, याची कोणतीही हमी किंवा खात्री देता येत नाही.या योजनेच्या मालमत्तेपैकी किमान 95 टक्के ते कमाल 100 टक्के गुंतवणूक एसबीआय निफ्टी200 व्हॅल्यू 30 ईटीएफच्या युनिट्समध्ये केली जाईल. उर्वरित 5 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक सरकारी रोख्यांमध्ये (G-Secs, SDLs आणि ट्रेझरी बिल्स), ट्रायपार्टी रेपो तसेच लिक्विड म्युच्युअल फंडांच्या युनिट्समध्ये केली जाऊ शकते.

एनएफओ कालावधीत किमान 5,000 रुपये गुंतवणूक करता येईल. त्यानंतरच्या गुंतवणुकीसाठी 1 रूपयाच्या पटीत रक्कम गुंतवता येईल. अतिरिक्त गुंतवणुकीसाठी किमान रक्कम 1,000 रुपये असून, त्यानंतर 1 रूपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल.या योजनेत दैनिक, साप्ताहिक, मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारेही गुंतवणूक करता येईल. अधिक माहितीसाठी योजनेच्या स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (एसआयडी) चा संदर्भ घ्यावा. एसबीआय निफ्टी200 व्हॅल्यू 30 ईटीएफचे फंड मॅनेजर विरल छाडवा आहेत. ते डिसेंबर 2020 पासून एसबीआय म्युच्युअल फंडशी संबंधित असून, सध्या ते संस्थेच्या विविध पॅसिव्ह गुंतवणूक योजनांचे व्यवस्थापन पाहतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande