परभणी - जिंतूर तालुक्यातील मोहखेड्यात पथकाच्या कारवाईत सव्वा कोटीचा गांजा जप्त
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - जिंतूर तालुक्यातील मोह खेड्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने एका शेतात मोठी धडक कारवाई करीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला.दरम्यान शेत ठोक्याने घेऊन गांजाची लागवड केल्याप्रकरणी परमेश्वर चांदणे याच्याविरुद्ध
परभणी - जिंतूर तालुक्यातील मोहखेड्यात पथकाच्या कारवाईत सव्वा कोटीचा गांजा जप्त


परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - जिंतूर तालुक्यातील मोह खेड्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने एका शेतात मोठी धडक कारवाई करीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला.दरम्यान शेत ठोक्याने घेऊन गांजाची लागवड केल्याप्रकरणी परमेश्वर चांदणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतप्रिया सिंग,पोलीस अधीक्षक अजित टीके,पोलीस अधीक्षक अनुज तारे, आणि पोलीस उपाधीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या कारवाई पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार, एपो ऊ.नी . संतोष वावळ हनुमंत जकवेवाड,पिराजी निळे, प्रशांत कोंकडे,काशिनाथ कुंडगीर रोहित मगर,विकास तायडे,शंकर कोसवेवाड, गणेश जाधव,महेंद्र दासरवार,तानाजी येळगे, आणि शेख मुजीब यांचा सहभाग होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande