परभणी - जैन धर्मियांच्या दशलक्षण महापर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरातील भजन गल्ली येथील श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात जैन धर्मीयांचे महत्त्वाचे दशलक्षण महापर्व उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. 16 ते 25 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महापर्वा
जैन धर्मीयांच्या दशलक्षण महापर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता


परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरातील भजन गल्ली येथील श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात जैन धर्मीयांचे महत्त्वाचे दशलक्षण महापर्व उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. 16 ते 25 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महापर्वाची सांगता गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली.

भजन गल्ली येथील जैन मंदिरातून भगवंताची मिरवणूक व पालखी काढण्यात आली. नानलपेठ, शिवाजी रोड, शिवाजी चौक, सुभाष रोड मार्गे ही मिरवणूक पुन्हा जैन मंदिरात पोहोचली. मिरवणुकीत घोडे, रथ, वाद्यवृंद तसेच महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीनंतर जैन मंदिरात भगवंताचा अभिषेक व पूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ब्रह्मचारिणी भारती दीदी यांचे मंगल प्रवचन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा अनेक मान्यवरांसह समाजबांधवांनी लाभ घेतला. महापर्वाच्या सांगता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे विश्वस्त व कार्यकारिणी, युवक मंडळ, महिला मंडळ तसेच सकल जैन समाजातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande