परभणी - सोनपेठ तालुक्यात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात; ट्रिगर-1 लागू
परभणी, 30 सप्टेंबर (हिं.स.)। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे सोनपेठ तालुक्यात पावसाचे प्रमाण आणि वितरण प्रतिकूल राहिल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या नुक
परभणी - सोनपेठ तालुक्यात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात; ट्रिगर-1 लागू


परभणी, 30 सप्टेंबर (हिं.स.)। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे सोनपेठ तालुक्यात पावसाचे प्रमाण आणि वितरण प्रतिकूल राहिल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या नुकसानीची दखल घेत ट्रिगर-1 लागू झाल्यानंतर तालुक्यात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे.तालुक्यातील बोंदरगाव, चुकार पिंपरीसह विविध गावांमध्ये त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकर्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. बोंदरगाव येथे झालेल्या पाहणीदरम्यान सहाय्यक कृषी अधिकारी बालासाहेब शिनगारे, ग्रामविकास अधिकारी पी. एम. भोसले, ग्राम महसूल अधिकारी पानझडे, कोल्हे, सरपंच मदन सपकाळ यांच्यासह राजाभाऊ मुंडे, श्याम सपकाळ, रामभाऊ चतुर, हनुमान सपकाळ, लहूदास सपकाळ, श्रीराम सपकाळ, गोकुळदास चतुर, बाळासाहेब चाटे, परमेश्वर चाटे तसेच शेतकरी उपस्थित होते. पाहणीदरम्यान नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक माहिती नोंदविण्यात आली. नुकसानग्रस्त पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande