
ठाणे, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। पिसे हेड वर्क येथे अतिवृष्टी व वादळी पावसामुळे पंप हाऊसमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, संबंधित यंत्रणांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे उद्या गुरुवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर