
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुनर्विकासाच्या कामाच्या अनुषंगाने प्लॅटफॉर्म क्रमांक 14 व 15 तसेच स्टॅबलिंग लाईन क्रमांक 15 साठी 75 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक 01.10.2026 ते 15.12.2026 या कालावधीत राहणार आहे.
गाडी क्र. 11002 बल्लारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस ची सेवा दिनांक 30.09.2026 ते 14.12.2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादर स्थानकापर्यंतच मर्यादित करण्यात येणार आहे.वरील कालावधीत ही गाडी दादर स्थानकावर अल्प समाप्त (Short Terminate) करण्यात येईल.प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुनर्विकासाचे काम सुरक्षितपणे आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis