परभणी - सरफराज नगरातील मटका बुकीविरोधात कारवाईची मागणी; जि. पोलिस अधिक्षकांना निवेदन
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरातील सरफराज नगर परिसरातील मटका बुकी चालवणाऱ्या व्यक्तीविरुद् तसेच त्याला मदत करणार्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून मटका बुकी बंद करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)च्या पदाधिकार्यांनी
परभणी - सरफराज नगरातील मटका बुकीविरोधात कारवाईची मागणी; जि. पोलिस अधिक्षकांना निवेदन


परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरातील सरफराज नगर परिसरातील मटका बुकी चालवणाऱ्या व्यक्तीविरुद् तसेच त्याला मदत करणार्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून मटका बुकी बंद करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)च्या पदाधिकार्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरफराज नगर परिसरात मटका बुकी सुरू असल्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्याच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवत आहे. तसेच परिसरात काही गुंडप्रवृत्तीचे युवक हत्यारे घेऊन फिरत असल्याने महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या भागातील मटका चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध यापूर्वी मटका तसेच जीवितहानीसंदर्भातील गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करूनही मटका बुकी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या व्यवसायामागे वेश्याव्यवसायही सुरू असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. परिसरातील नागरिकांचे संरक्षण आणि शांतता कायम राखण्यासाठी मटका चालवणारे या व्यक्तीविरुद्ध तसेच त्याच्या व्यवसायात मदत करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि संबंधित बुकी बंद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)च्या मराठवाडा अध्यक्षा रानुबाई वायवळ, जिल्हाध्यक्ष पप्पु काकडे, अविनाश गायकवाड, योगेश पंडित, करण सावंत आणि सचिन शिंदे यांच्या स्वाक्षर्या निवेदनावर आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande