रत्नागिरी : 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणालीची अंमलबजावणी सुरू
रत्नागिरी, 30 सप्टेंबर (हिं.स.) । शासनाच्या नवीन क्रीडा धोरणांतर्गत गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने देण्यासाठी क्रीडा ई-प्रमाण (Krida e-Pramaan) ही ब्लॉकचेन व एआय आधारित प्
रत्नागिरी : 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणालीची अंमलबजावणी सुरू


रत्नागिरी, 30 सप्टेंबर (हिं.स.) । शासनाच्या नवीन क्रीडा धोरणांतर्गत गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने देण्यासाठी क्रीडा ई-प्रमाण (Krida e-Pramaan) ही ब्लॉकचेन व एआय आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपल्यापासून ७ दिवसांच्या आत खेळाडूंची यादी व निकाल xlsx फाFल स्वरूपात पोर्टलवर डिजिटल स्वाक्षरीसह अपलोड करणे अनिवार्य आहे. मुदतीत माहिती न दिल्यास खेळाडूंच्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संघटनेची राहील.

खेळाडूंना आता कागदपत्रे घेऊन विभागीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. त्यांनी https://sports.maharashtra.gov.in किंवा https://kridaepramaan.org/register या पोर्टलवर आधार-संलग्न ओळख क्रमांकाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे बोगस प्रमाणपत्रांना आळा बसणार असून पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आणि जलद होईल याकरिता शासनाने ८ जानेवारी, २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande