भारताची वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने मात, कर्णधार गिलचे झंझावती द्विशतक
गुवाहाटी, 30 सप्टेंबर (हिं.स.) । गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर अनेक विक्रमांची नोंद झाली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात धावा, शतके आणि विक्रमांचा वर्षाव झाला. दोन्ही संघांनी मिळून एकूण चार शतके आणि एक द्विशतक झळकावले. एकूण ८१
शुभमन गिल


रोहित शर्मा


गुवाहाटी, 30 सप्टेंबर (हिं.स.) । गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर अनेक विक्रमांची नोंद झाली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात धावा, शतके आणि विक्रमांचा वर्षाव झाला. दोन्ही संघांनी मिळून एकूण चार शतके आणि एक द्विशतक झळकावले. एकूण ८११ धावा झाल्या. हा रोमांचक सामना जिंकून, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहास रचला. गिलचे द्विशतक आणि रोहितच्या शतकामुळे भारताने वेस्ट इंडिजचे ४०६ धावांचे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात मोठे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण करून एक नवीन अध्याय लिहिला. एकदिवसीय सामन्यांमधील भारताचा हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. यासह, भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका एक सामना शिल्लक असतानाच जिंकली. भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

सर्वात वेगवान एकदिवसीय द्विशतक

शुभमन गिलने अवघ्या ११७ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले, जे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठरले आहे. त्याने १२६ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावण्याचा इशान किशनचा विक्रम मोडला. आपल्या स्फोटक खेळीदरम्यान गिलने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. द्विशतक पूर्ण करून, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये एकापेक्षा जास्त द्विशतके झळकावणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी केवळ रोहित शर्माने ही कामगिरी केली होती. यापूर्वी गिलने २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २०८ धावा केल्या होत्या.

रोहित शर्माच्या १२,००० धावा पूर्ण

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. मात्र, दुसऱ्या सामन्यात हिटमॅनने ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करणारा रोहित केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने २८२ डावांमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या. सचिनने ३०० डावांमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या होत्या.

एकदिवसीय सामन्यांमधील भारताची दुसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी

रोहित आणि गिलने गुवाहाटीमध्ये २५५ धावांची सलामीची भागीदारी केली, जी एकदिवसीय सामन्यांमधील भारताची दुसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी आहे. २००१ मध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी रचलेला विक्रम मोडण्यात ते कमी पडले. २००१ मध्ये केन पार्ल येथे तेंडुलकर आणि गांगुली यांनी सलामीला २५८ धावांची भागीदारी केली होती. पण, रोहित आणि गिलच्या जोडीने १९९८ मध्ये तेंडुलकर आणि गांगुली यांनी रचलेला विक्रम मोडला. या दोघांनी कोलंबोमध्ये २५२ धावांची भागीदारी केली. प्रथम फलंदाजी करताना, वेस्ट इंडिजने ५० षटकांत सात गडी गमावून ४०५ धावा केल्या. जॉन कॅम्पबेलने १०१, कर्णधार शाई होपने १०४ आणि अमीरने ११४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताच्या रोहित शर्माने ७५ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या, तर कर्णधार शुभमन गिलने द्विशतक झळकावले. यामुळेच भारताने 8 गडी राखून शानदार विजय मिळवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande