ट्रम्प प्रशासनाकडून इराणशी संबंधित १० व्यक्ती- संस्थांवर निर्बंध
वॉशिंग्टन , 30 सप्टेंबर (हिं.स.)।इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेले युद्ध अद्याप संपलेले नाही. दोन्ही देशांमध्ये संघर्ष समाप्त करण्याबाबत अद्याप कोणताही करार होऊ शकलेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतर देशांना इराणला मदत न करण्याच
ट्रम्प प्रशासनाकडून इराणशी संबंधित १० व्यक्ती- संस्थांवर निर्बंध


वॉशिंग्टन , 30 सप्टेंबर (हिं.स.)।इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेले युद्ध अद्याप संपलेले नाही. दोन्ही देशांमध्ये संघर्ष समाप्त करण्याबाबत अद्याप कोणताही करार होऊ शकलेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतर देशांना इराणला मदत न करण्याचा इशारा देत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने मंगळवारी १० व्यक्ती आणि संस्थांवर निर्बंध लादले. या व्यक्ती आणि संस्थांवर इराणच्या संरक्षण मंत्रालयासाठी तसेच सशस्त्र दलांच्या रसद विभागासाठी शस्त्रे आणि सुटे भाग खरेदी केल्याचा आरोप आहे.

अमेरिकेने इराणविरोधात ‘ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट’ या मोहिमेअंतर्गत हे निर्बंध लादले आहेत. निर्बंधांच्या यादीत बीजिंगस्थित इराणच्या संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलांच्या रसद विभागाचा एक प्रतिनिधी तसेच इराण, चीन, हाँगकाँग, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्किये येथे कार्यरत असलेल्या खरेदी नेटवर्कचा समावेश आहे.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की, या नेटवर्कने इराणच्या ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पुरवठा केला. तसेच शस्त्रास्त्रांची खरेदी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी मध्यस्थ म्हणूनही या नेटवर्कने काम केले.या निर्बंधांअंतर्गत अमेरिकेशी संबंधित मालमत्ता गोठवण्यात आली आहे. तसेच निर्बंधित व्यक्ती किंवा संस्थांसोबत व्यवहार करणाऱ्या परदेशी वित्तीय संस्थांवर दुय्यम निर्बंध लादले जाऊ शकतात.

इराणबाबत ट्रम्प म्हणाले, “ते शरणागती पत्करतील.” गेल्या काही दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इतिहासातील इतर कोणत्याही कालावधीपेक्षा अधिक तेल बाहेर काढण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. ट्रम्प यांनी इराणची परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे सांगितले. मात्र, इराण सध्या शरणागती पत्करेल की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, इराणने दावा केला आहे की, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या दुसऱ्या ‘ॲडव्हान्स्ड अंडरवॉटर व्हेईकल’ अर्थात मानवरहित पाणबुडी ‘रेमस ६००’वर ताबा मिळवला आहे. अमेरिकेच्या मानवरहित पाणबुडीवर कथित ताबा मिळवल्याबाबत आयआरजीसीने सांगितले की, हा ताबा समन्वयित आणि अत्यंत गुंतागुंतीच्या मोहिमेद्वारे मिळवण्यात आला. या कारवाईत इराणी सैन्याच्या गुप्तचर देखरेख आणि इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमतांचा वापर करण्यात आल्याचेही आयआरजीसीने म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande