उपराष्ट्रपती राधाकृष्णन शनिवारी चेन्नई दौऱ्यावर
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.) - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 5 सप्टेंबर रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. उपराष्ट्रपती या दौऱ्यादरम्यान, ''इंडिया व्हॉल्व्हज 2026'' या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होती
सीपी राधाकृष्णन


नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.) - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 5 सप्टेंबर रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

उपराष्ट्रपती या दौऱ्यादरम्यान, 'इंडिया व्हॉल्व्हज 2026' या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होतील. हृदयाच्या झडपांशी संबंधित (Valvular) आणि संरचनात्मक हृदयरोगांच्या उपचारपद्धतींमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, उपराष्ट्रपती गिंडी येथे 'इंडिया व्हॉल्व्ह रजिस्ट्री'चे उद्घाटन करतील.

चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे आयोजित कार्यक्रमात 'दिनमलार' वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या 75व्या वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते केले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande