अमरावती जिल्ह्यात २४०० गणेश मंडळात होणार बाप्पाची स्थापना
प्रशासन सज्ज : ३८७ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला बळ अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक गणेशोत्सवाला सात दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रशासनासह मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये दोन हजार ३९९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
जिल्ह्यात २४०० गणेश मंडळात होणार बाप्पाची स्थापना


प्रशासन सज्ज : ३८७ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला बळ

अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक गणेशोत्सवाला सात दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रशासनासह मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये दोन हजार ३९९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी ३८७ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविल्या जात असून, त्यातून एकात्मतेला बळ देण्याचा प्रयत्न होतांनी दिसतो. अमरावती शहरातील राजापेठ, शहर कोतवाली, खोलापुरीगेट, भातकुली, गाडगेनगर, नागपुरीगेट, वलगाव, फ्रेजरपुरा, बडनेरा आणि नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत २०२५ मध्ये ५९० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यात सात गावांमध्ये आयुक्तालयात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविल्या जात आहे. गणेशोत्सव मंडळांच्या संख्येमध्ये २०२६ मध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिस विभागाने वर्तविली आहे.

शहरातील सर्वाधिक १२१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत असून, त्यात पाठोपाठ राजापेठ व बडनेरा या दोन ठाण्यांच्या परिसरात प्रत्येकी ७७ गणेश मंडळांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर खोलापुरीगेट हद्दीत ७० मंडळे आहेत. शहर कोतवाली ३२, भातकुली २३, नागपुरीगेट १३, वलगाव ५६, फ्रेजरपुरा ६१, तर नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत ६० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३१ पोलिस ठाण्यांचा विचार केल्यास सर्वाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या धारणीहद्दीत १९८ असून, दुसऱ्या क्रमांकावर मोर्शी १०४, तर तिसऱ्या क्रमांकावर अंजनगावसुर्जी ९६ ही तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक संख्या दिसून येते. ग्रामीण भागात एकूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या एक हजार ४१६ असून, ३८० गावांत ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला बळ दिल्या जात आहे. त्यात तालुक्याच्या ठिकाणी ४७६ तर गावांमध्ये ९४० च्या आसपास मंडळांची संख्या असल्याचे दिसून येते.सोमवारपासून ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मंडळांकरिता मार्गदर्शक तत्त्वे जारी

मंडपात स्थापन केलेल्या मूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी देखाव्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी बळजबरीने वर्गणी वसूल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई महाप्रसादाकरिता एफडीएकडे करावी लागेल विचारणा स्थापन करण्यात येणाऱ्या मूर्ती व मंडपाच्या उंचीचे बंधन अवैध वीज वापर करणाऱ्यांवर महावितरणची नजर राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande