अमरावती : ‘माझी वसुंधरा ४.०’मध्ये अव्वल माहुली जहागीर ग्रामपंचायतीला उर्वरित २५ लाखांचे बक्षीस मंजूर
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। उत्कृष्ट कार्यकरत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये अमरावती विभागात पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावणाऱ्या माहुली जहागीर ग्रामपंचयातीच्या सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) कामांना प्रश
माहुली जहागीर ग्रामपंचायतीला २५ लाखांची बक्षिस रक्कम मंजूर


अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। उत्कृष्ट कार्यकरत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये अमरावती विभागात पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावणाऱ्या माहुली जहागीर ग्रामपंचयातीच्या सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करत आज ५० लाखांच्या एकूण बक्षीसातील उर्वरीत २५ लाखांची रक्कम वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये बक्षीस पटकाविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त डीपीआर अंतर्गत माहुली जहागीर ग्रामपंचायतीच्या अहवालावर चर्चा करून उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीअंती ७ सप्टेंबर २०२६ पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने शासन निर्णयाद्वारे ही प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत ५ ते १० हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचातींच्या गटात अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या माहुली जहागीर ग्रामपंचायतीस एकूण बक्षीस रकमेच्या ५० टक्के म्हणजेच २५ लाखांची रक्कम यापूर्वीच वितरीत करण्यात आली आहे. आजच्या शासन निर्णयाद्वारे ग्रामपंचायतीच्या डीपीआरमधील कामांसाठी उर्वरीत २५ लाखांची रक्कम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीकडून शासनास सादर डिपीआरमध्ये ग्रामपंचयातीच्या दुतर्फा झाडे व कुंपन लावणे,वार्ड क्र.३ मध्ये झाडे लावणे,ग्रामपंचायतीवर ४ के.व्ही.क्षमतेचे सोलार उभारणे,गावासाठी पाणी पुरवठा होणाऱ्या विहिरीवर १० के.व्ही.क्षमतेचे सोलार उभारणे, गावात एलईडी दिवे बसवीणे, गावातील ८ही अंगणवाडयांमध्ये पावसाच्या पाण्याच्या संचयनाची व्यवस्था करणे आदी कामांचा अंतर्भाव आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande