अमरावती : बाप्पांच्या रोषणाईसाठी आकोडा टाकू नका; 'प्री-पेड मीटर'साठी अर्ज करा !
आधी पैसे भरून वीज वापरा : मंडळांनी वीज वापराचे नियोजन करावे, सुरक्षेची काळजी घ्यावी अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाची लगबग सुरू होण्यापूर्वीच सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी वीज जोडणीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात
बाप्पांच्या रोषणाईसाठी आकोडा टाकू नका; 'प्री-पेड मीटर'साठी अर्ज करा !


आधी पैसे भरून वीज वापरा : मंडळांनी वीज वापराचे नियोजन करावे, सुरक्षेची काळजी घ्यावी

अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाची लगबग सुरू होण्यापूर्वीच सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी वीज जोडणीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह धार्मिक उत्सवांसाठी घेण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आता 'प्री-पेड स्मार्ट मीटर'ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लागणारा दर घरगुती दरानुसार राहणार आहे. मोबाइल रिचार्जप्रमाणे आधी पैसे भरून त्यानंतर वीज वापरता येणार असल्याने मंडळांना वीज वापराचे नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, अनधिकृत वीज जोडणी टाळून अधिकृत पद्धतीने वीज घेणे आणि मंडपातील विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मंडप उभारतानाही काळजी घेण्याची गरज

मंडप उभारताना विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. मंडपाचा सांगाडा, लोखंडी पाईप, पताका किंवा सजावटीचे साहित्य विद्युत तारांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. रोषणाईच्या तारा व्यवस्थित इन्सुलेट करून सुरक्षित पद्धतीने लावणे आवश्यक आहे.

वीजचोरीसाठी दंड व शिक्षेची तरतूद

अधिकृत जोडणी न घेता वीज वापरणे किंवा मीटरमध्ये छेडछाड करणे हा गंभीर प्रकार आहे. वीज अधिनियम, २००३ अंतर्गत वीजचोरीसाठी दंड तसेच शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे उत्सव मंडळांनी अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेऊनच रोषणाई व विद्युत उपकरणांचा वापर करावा ऐसे आवाहन महावितरण च्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande