नांदेड : घोगरे यांच्या कुटुंबास दहा लाखांचा धनादेश
नांदेड, 11 ऑक्टोबर (हिं.स.) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी मौजे भानपूर ता.जि. नांदेड येथील स्व. संतोष विक्रम घोगरे यांनी रेल्वेसमोर उडी मारून आपले अमूल्य जीवन अर्पण केले.त्यांच्या या बलिदानास नतमस्तक होत, त्यांच्या निवासस्थानी भेट
अ


नांदेड, 11 ऑक्टोबर (हिं.स.) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी मौजे भानपूर ता.जि. नांदेड येथील स्व. संतोष विक्रम घोगरे यांनी रेल्वेसमोर उडी मारून आपले अमूल्य जीवन अर्पण केले.त्यांच्या या बलिदानास नतमस्तक होत, त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन महाराष्ट्र शासनामार्फत त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून ₹१० लाख रुपयांचा धनादेश आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

या वेळी तहसीलदार संजय वारकड,ओबीसी जिल्हा प्रमुख मंगेश कदम,तालुका प्रमुख धनंजय पावडे, मराठा सेवक श्याम पाटील वडजे, विठ्ठल पावडे, जनार्दन शेजुळे, जयवंत कदम, बालाजी पावडे, माधव घोगरे, मंडळाधिकारी श्री.कुणाल जगताप व रूपाली वाठोरे मॅडम,तलाठी महेश जोशी,पो. पाटील संतोष यशवंत घोगरे, बालाजी घोगरे तसेच मौजे भानपूर येथील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande