परभणी, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्री अष्टभूजा नगरातर्फे नवा मोंढ्यातील रोकडा हनुमान मंदिराजवळील मैदानावर विजयादशमीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघाचे अखिल भारतीय सह सरकार्यवाह अरुणकुमारजी हे प्रमुख वक्ते म्हणून तर सनदी लेखापाल व उद्योजक प्रमोद जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अन्य माध्यवरांसह हजारो स्वयंसेवक तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis