अकोला जिल्हा ग्रामीण भाजपा महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या जंबो कार्यकारिणीची घोषणा जिल्हा अध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी केली. “सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीवर आधारित ही कार्
P


अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या जंबो कार्यकारिणीची घोषणा जिल्हा अध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी केली. “सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीवर आधारित ही कार्यकारिणी रचना करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी विविध घटकांतील आणि स्तरांवरील महिलांना यात प्राधान्य देण्यात आले आहे.

या कार्यकारिणीबाबत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फुंडकर, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा आमदार चित्रा वाघ, तसेच जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करण्यात आली.

जयश्री पुंडकर यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही कार्यकारिणी जाहीर केली. “प्रत्येक गावात, प्रत्येक नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे,” असे त्यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सरचिटणीसपदी मूर्तिजापूरच्या माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे आणि अकोटच्या माजी नगरसेविका माया धुळे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.

उपाध्यक्ष म्हणून शालिनी हजारे, रेखा गोतरकर, प्रतिभा धर्माळे आणि छाया मानकर यांची नियुक्ती झाली.

सचिवपदी प्रिया महल्ले, मीना नकासकर, सुनिता बगाडे आणि शितल गावंडे यांची निवड करण्यात आली.

कोषाध्यक्ष म्हणून कल्पना पोहणे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून ज्योती टाले आणि सोशल मीडिया प्रमुख म्हणून गौरी चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सदस्यपदी मनीषा विजेकर, दिपाली तिडके, पल्लवी नेमाडे, चुळसा गाडगे, मंजुषा लोथे, रेखा भाकरे, कुसुम जायले, सिंधू गडम, चंदा आमले, पल्लवी कदम, प्रतिभा येऊन, वंदना लोणकर, अनिता देवीकर, अनिता पवार, रूपल गुजराती, ज्योती ठोकळ आणि स्वाती गंभीरे यांचा समावेश आहे.

कायम निमंत्रित सदस्य म्हणून सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, समीक्षा धोत्रे, नलिनी भारसकळे, नूतन पिंपळे, पुष्पा खंडेलवाल, शिला खेडकर, माधवी कुलकर्णी, सीमा मांगटे, कुसुम भगत आणि वैशाली निकम या ज्येष्ठ कार्यकर्त्या सहभागी आहेत.

कार्यकारिणी जाहीर होताच जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी जयश्री पुंडकर यांचे स्वागत फुलांच्या हारांनी व घोषणाबाजीने केले.

“ही जंबो कार्यकारिणी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवेल आणि महिलांना नेतृत्वासाठी प्रोत्साहन देईल,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

जयश्री पुंडकर यांनी जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये बैठका घेऊन पक्ष मजबूत करण्याचे आणि आगामी निवडणुकांत विजय मिळविण्याचे आवाहन केले. अकोला जिल्हा ग्रामीण भाजपा महिला मोर्चाची ही कार्यकारिणी महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande