अकोला : शेतकरी संघटनेचा राज्य सरकारवर हल्लाबोल
अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली, तरी ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी संघटना (शरद जोशी स्थापित) या
प


अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली, तरी ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी संघटना (शरद जोशी स्थापित) यांनी व्यक्त केली आहे.संघटनेने सरकारवर जी.आर. वारंवार बदलून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून, या निर्णयात “न्याय, अर्थशास्त्र आणि संवेदनशीलता या तिन्हींचा अभाव आहे” असंही म्हटलं आहे. सरकारचं हे पाऊल ऐतिहासिक नसून शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारे कृत्य असल्याची टीका संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी केली आहे.

संघटनेच्या मते, मागील अतिवृष्टीच्या काळात दिलेल्या मदतीपेक्षा यावेळची मदत अधिक तोकडी असून, प्रती हेक्टर दीड लाख रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, जाहीर केलेल्या ३१,६२८ कोटींच्या निधीतून केवळ साडेसहा हजार कोटी रुपयेच प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी राखीव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.या जी.आर.चा निषेध म्हणून १६ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जीआरची होळी” आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande