अजित पवार यांनी वारजेतील चौधरी चौकापासून केली पाहणी
पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी वारजे, आहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील विविध विक
अजित पवार यांनी वारजेतील चौधरी चौकापासून केली पाहणी


पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी वारजे, आहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. पुणे नगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

अजित पवार यांनी वारजेतील चौधरी चौकापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा, आणि नागरिकांच्या तक्रारी यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली. त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी, विकास कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धायरी आणि नांदेड सिटी परिसरात विकासकामांचा आढावा घेतला. वारजे-शिवणे पुलाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर शिवणे पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याचे आदेश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

--------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande