जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज : पालकमंत्री गोरे
सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीमध्ये सोबत आलेल्यांना घेऊन, अन्यथा न आलेल्यांना सलाम करून
जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज : पालकमंत्री गोरे


सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीमध्ये सोबत आलेल्यांना घेऊन, अन्यथा न आलेल्यांना सलाम करून सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी भाजप सज्ज झाले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते उद्योगपती बाळासाहेब एरंडे व उद्योगपती भाऊसाहेब रुपनर त्यांच्या सहकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सांवत, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राजश्रीताई नागणे -पाटील, शिवाजीराव गायकवाड, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपनर, माजी सभापती बाळासाहेब काटकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande