बीड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत दिसत नाही. स्थानिक पातळीवर नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.बीड नगर परिषदेवर यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची सत्ता येईल असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
आज राष्ट्रवादी भवन, बीड येथे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी बीड नगर परिषदेवर यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची सत्ता येईल असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
जनतेच्या आशा-अपेक्षांचा वेध घेत, विकास आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहिण्याची तयारी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis