अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। आज दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान, शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करी करणारा एक ट्रक पकडण्यात आला. ही कारवाई राजपूत धाबा ते लालखडी रोड दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमधून २९ गोवंश जनावरे ताब्यात घेतली असून, त्यांची अंदाजे बाजारमूल्य ₹१८ लाख इतकी आहे. घटनास्थळी पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक कार्यरत आहे.सदर प्रकरणात गोवंश संरक्षण कायद्यानुसार आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक जप्त करण्यात आला असून, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, नागपुरी गेट पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी