धाराशिव: भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण
धाराशिव, दि.11 ऑक्टोबर (हिं.स.)धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पानगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराच
अ


धाराशिव, दि.11 ऑक्टोबर (हिं.स.)धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पानगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे

शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी पानगाव येथील शेतकरी श्री. रामचंद्र दत्तात्रय चव्हाण यांनी आपले 'आमरण उपोषण' सुरू केले आहे. पानगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून, प्रशासनाने जोपर्यंत दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सन २०२० ते २०२५ दरम्यान गावात मंजूर झालेल्या सिंचन विहीर, घरकुल, गायगोठा व फळबाग योजनांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून लाखोंचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप श्री. चव्हाण यांनी केला आहे. अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवून निधी हडप करण्यात आला, तर काही ठिकाणी अर्धवट काम करून पूर्ण रक्कम उचलण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी त्यांनी यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, महिनाभरानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशीचे आश्वासन न मिळाल्याने, अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande