परभणी : आयशर - दुचाकीच्या अपघातात एक ठार,
परभणी, 11 ऑक्टोबर (हिं.स.)परभणी-वसमत महामार्गावर आसोला पाटी परिसरात आयशर वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश ता
आयशर - दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी


परभणी, 11 ऑक्टोबर (हिं.स.)परभणी-वसमत महामार्गावर आसोला पाटी परिसरात आयशर वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश तावडे, बालाजी रणेर, आप्पाराव व-हाडे व भगवान चोरघडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघातप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर (क्र. एमएच- ४४-७५५०) हे वाहन परभणी-वसमत रस्त्यावरून जात असताना आसोला पाटी शिवारात एका दुचाकीला (क्र. एमएच-२२ एसी-९२१५) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना अपघात झाला. या धडकेत दुचाकीवरील आरबाज मैनु शेख (वय २५, रा. पेडगाव, ता. जि. परभणी) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र अविनाश तरफडे गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी मैनु इब्राहिम शेख (रा. पेडगाव) यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande