लातूर, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे आर. के. नारायण यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन पोस्टर सादरीकरण स्पर्धेत शिरूर ताजबंद येथील चार विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे.
स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथील विद्यार्थिनी कु. पंचाळ श्वेता, कु. कमले कृष्णाई, कु. खोदवड अश्विनी आणि कु. पंचाळ मोनिका अशी त्यांची नावे आहेत. या उल्लेखनीय यशासाठी सर्व विद्यार्थिनी तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे शिरूर ताजबंद येथील नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन आपल्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis