नांदेड - संकरीत चारा बियाणे मोफत उपलब्ध
नांदेड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। नरब्बी हंगामासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम, वैरण व पशुखाद्य कार्यक्रम, चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत (सर्वसाधारण) या योजनेतुन सुधारीत संकरीत चारा बियाणे वैरणीचे
नांदेड - संकरीत चारा बियाणे मोफत उपलब्ध


नांदेड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। नरब्बी हंगामासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम, वैरण व पशुखाद्य कार्यक्रम, चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत (सर्वसाधारण) या योजनेतुन सुधारीत संकरीत चारा बियाणे वैरणीचे शंभर टक्के अनुदानावर पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्याकडून वाटप करण्यात येणार आहे.

विहित नमुन्यात परिपूर्ण भरलेले अर्ज सोमवार 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित पशुवैद्यकिय दवाखान्यात सादर करावेत. जास्तीत जास्त संख्येने नांदेड जिल्हयातील सर्व प्रर्वगाच्या व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, डॉ. राजकुमार पडिले यांनी केले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत किमान 3 ते ४ जनावरे आहेत अशा लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थीकडे चारा उत्पादनासाठी स्वत:ची शेत जमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सर्व प्रवर्गातील पशुपालकांना या योजनाचा लाभ घेता येईल.

जिल्हयातील १६ तालुक्यातुन या योजनेसाठी अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती किंवा नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande