गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याने शहरात तणाव
सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) आणि सांगोल्याचे दैवत मानले जाणारे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकाने दारूची बाटली फेकल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे
गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याने शहरात तणाव


सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) आणि सांगोल्याचे दैवत मानले जाणारे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकाने दारूची बाटली फेकल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या निंदनीय कृत्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आज (शनिवार) सांगोला बंदची हाक दिली आहे.

या घटनेनंतर देशमुख समर्थक आणि शेकाप कार्यकर्ते तीव्र आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी 'आबासाहेब अमर रहे' अशा घोषणा देत आबासाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. तसेच, ज्या घराला संपूर्ण तालुक्यात देवत्व आणि मंदिर मानले जाते, त्या घराची बाटली फेकल्यामुळे शुद्धीकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घर पाणी आणि दुधाने स्वच्छ केले.

शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, या तालुक्यातली तमाम जनता आबासाहेबांना देवाच्या रूपात पाहते. अशा घरात हे चुकीचे कृत्य घडले. संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप आहे, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला शांतताप्रिय असूनही बंदची हाक द्यावी लागली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande