मराठवाड्याच्या विकासात शिवाजी राव पंडितांचा मोठा सहभाग - हरिभाऊ बागडे
बीड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।शिवाजीराव (दादा) पंडित यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. मंत्री असताना रोजगार हमी योजनेवर टीका होत असतानाही त्यांनी राज्यभरात चांगले काम केले. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी ऊस क्षेत्र वाढवले. ग्रामीण भागात
अ


बीड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।शिवाजीराव (दादा) पंडित यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. मंत्री असताना रोजगार हमी योजनेवर टीका होत असतानाही त्यांनी राज्यभरात चांगले काम केले. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी ऊस क्षेत्र वाढवले. ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले. हे कार्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ (नाना) बागडे यांनी केले. गेवराई येथील शिवनगरी मैदानात माजी राज्यमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन झाले. यावेळी व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, शिवाजी महाराज नारायणगडकर, महादेव महाराज चाकरवाडीकर, माजी आमदार विलासराव खरात, अमरसिंह पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल बागडे म्हणाले, दादा ८८ व्या वर्षीही पूर्वीइतक्याच जोमाने काम करत आहेत. त्यांची शताब्दीही याच ठिकाणी साजरी व्हावी. त्या वेळी मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीमंडळ उपस्थित राहावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्याच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. रोजगार हमी खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, पाझर तलाव, जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे अनेक भाग सुपीक झाले. कालव्यांच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्यातही दादांचा मोठा वाटा आहे. स्वच्छ प्रतिमा आणि एकोप्याचे राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. . कार्यक्रमात जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह अभिष्टचिंतन समितीच्या वतीने सर्व संत-महंतांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आमदार विजयसिंह पंडित यांनी केले. ते म्हणाले, दादांनी उपेक्षित घटकांसाठी काम केले. आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत आहोत. मतदारसंघातील जनतेने भरभरून पाठिंबा दिला. त्यामुळे विधानमंडळात दहा महिन्यांत चांगले काम करता आले. यापुढेही अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू राहतील. शेवटी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande