नीलेश घायवळ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही - अजित पवार
पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। गुंड निलेश घायवळ यास कोणी पासपोर्ट दिला, कोणी शिफारस केली, याची सविस्तर माहिती घेतली जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवान्यासाठी पोलिस आयुक्तांकडे शिफारस केली असेल, मात्र पोलिस आयुक्‍तांनी त्यास परवाना दिलेल
नीलेश घायवळ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही - अजित पवार


पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

गुंड निलेश घायवळ यास कोणी पासपोर्ट दिला, कोणी शिफारस केली, याची सविस्तर माहिती घेतली जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवान्यासाठी पोलिस आयुक्तांकडे शिफारस केली असेल, मात्र पोलिस आयुक्‍तांनी त्यास परवाना दिलेला नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांचा गट, पक्ष न बघता त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. या प्रकरणात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही.' असे राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे परिवार मिलन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पवार यांनी मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, राजकीय व्यक्तींसमवेत अनेकजण मोबाइलद्वारे फोटो, व्हिडिओ काढतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande