कपिलधार वाडी (जि. बीड) येथील पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
बीड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)मौजे कपिलधारवाडी व हिंगणी खुर्द येथील नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक पार पडली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुनर्वसन प्रक्रियेतील आवश्यक टप्प्य
अ


बीड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)मौजे कपिलधारवाडी व हिंगणी खुर्द येथील नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुनर्वसन प्रक्रियेतील आवश्यक टप्प्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुनर्वसनाचे काम नियोजनबद्ध व तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत अडचणी, पर्यायी स्थळांची निवड आणि आवश्यक मूलभूत सुविधा यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाकडून पुनर्वसित नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा विश्वास दिला गेला.

मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रकल्प संचालक, विविध विभागांचे अधिकारी तसेच संबंधित गावांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यावेळी उपस्थित होते

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande