लातूर : शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीची पूरग्रस्तांना मदत
लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रमात पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात दिला आहे. ग्रामपंचायत शिरूर ताजबंद तर्फे रु. ५१,०००/- मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना सुपूर्द करण्यात आला
अ


लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रमात पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात दिला आहे. ग्रामपंचायत शिरूर ताजबंद तर्फे रु. ५१,०००/- मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना सुपूर्द करण्यात आला. ही मदत सरपंच, उपसरपंच यांच्या २५ टक्के मानधनाची एक वर्षाची रक्कम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या तीन महिन्यांच्या मानधनातून जमा करण्यात आली आहे.

सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवून आपल्या ग्रामपंचायतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रामपंचायतीने पाऊल उचलेले आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, बांधकाम सभापती युवराज पाटील, शिक्षण सभापती किशन कापसे, आरोग्य सभापती शुभम सारोळे, शिवसेना नेते अनिल लामतुरे,ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande