लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते, अधिकारी कृती समिती च्या काम बंद आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला.
महावितरण, महापारेषण,महानिर्मिती कंपनीतील विविध मार्गातुन होणाऱ्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचारी, अभियंते,अधिकारी यांच्या आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला.
याशिवाय विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलनास बसलेल्या कर्मचारी,अभियंते,अधिकारी यांच्या अडी-अडचणी समजून शासनाकडे त्यांच्या असणाऱ्या मागण्याच्या पुर्नविचार शासनाने करावा,अशी मागणी यावेळी केली.
याप्रसंगी राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis