लातूर : विलास साखर कारखान्यात १५ इनफिल्डरचे पुजन
लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साखर कारखान्याच्या वतीने कारखाना स्थळी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजीत करण्यात आले होते, त्
अ


लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साखर कारखान्याच्या वतीने कारखाना स्थळी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजीत करण्यात आले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच १५ इनफिल्डरचे व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले.

विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना स्थळी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात आरोग्य तपासणी करुन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर १५ इनफिल्डरचे व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले.

या आरोग्य शिबीरात डॉ. अभिजीत यादव, डॉ. बजरंग खडबडे, डॉ.शंकर साबळे, डॉ.विजय कसबे, डॉ. जावेद तांबोळी डॉ. कैफ काझी, वैदयकीय अधिकरी डॅा. नंदकीशोर निकते यांनी तपासणी व आरोग्य उपचार केले. यावेळी त्यांना बालाजी कदम, सुनील यादव, काशीनाथ भातमोडे, अतिश मस्के, पंकज किनगावकर, स्वप्नील आव्हाड यांनी मदत केली. या शिबीराचा २०० कर्मचारी यांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील संचालक अमृत हरिश्चंद्र जाधव यांच्यासह सभासद, ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande