पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक - मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे, असे मत राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होत्या. ''पर्यावरणी
अतुल सावे


छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे, असे मत राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होत्या. 'पर्यावरणीय बदल : सद्यस्थिती आणि आव्हाने' या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.

पर्यावरणातील वाढते प्रदूषण, हवामानातील अस्थिरता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न या संदर्भात विषयातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विचारमंथन केले.

यावेळी संबंधित विषयाचे देशभरातील तज्ञ, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande