गुंड निलेश घायवळ प्रकरण : जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर
पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या प्रकरणात आता पुणे पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. याअंतर्गत, पुणे पोलिसांनी कुख्यात फरार गुंड निलेश घायवळ याच्याविरुद्ध बनावट पासपोर्ट मिळवणे आणि कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती लपवल्याच्या आ
गुंड निलेश घायवळ प्रकरण : जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर


पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या प्रकरणात आता पुणे पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. याअंतर्गत, पुणे पोलिसांनी कुख्यात फरार गुंड निलेश घायवळ याच्याविरुद्ध बनावट पासपोर्ट मिळवणे आणि कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती लपवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तसेच लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. निलेश घायवळची जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणं समोर आली आहेत. पोलीस तपासातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जमिनीचा व्यवहार हा कोट्यवधी रुपयांचा असल्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि त्याने केलेल्या जमिनीच्या व्यवहाराचा समांतर तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande