पीएमआरडीएची नऊ क्षेत्रीय कार्यालये सुरू
पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या अथवा अडचणी निकाली काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तालुकानिहाय नव्याने ९ क्षेत्रीय कार्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे नागरी समस्या सोडविणे, तसेच आणि बांधकाम
पीएमआरडीएची नऊ क्षेत्रीय कार्यालये सुरू


पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या अथवा अडचणी निकाली काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तालुकानिहाय नव्याने ९ क्षेत्रीय कार्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे नागरी समस्या सोडविणे, तसेच आणि बांधकाम परवानगीबाबतचे प्रश्न आता संबंधित तालुकानिहाय सुटणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत ९ तालुक्यांतील ६९७ गावांचा कारभार चालतो. या गावांतील नागरिकांचे प्रश्न, तसेच बांधकाम परवानगीबाबतच्या कामकाजासाठी संबंधितांना मुख्य कार्यालय आकुर्डी या ठ‍िकाणी यावे लागत होते. यामुळे नागरिकांचा अधिक वेळ जात असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याची दखल घेत पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ९ तालुक्यांत क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता तालुका कार्यालयातून संबंध‍ित तालुक्याचे कामकाज पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाच्या सभेत यास मान्यता दिली होती. या निर्णयामुळे शक्यतो नागरिकांना आता पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी आणि पुण्यातील औंधमधील कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande