नांदेड, 11 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वसंतनगर मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर मुखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने एकूण ८६३ रिक्त पदांसाठी एकूण ३० विविध खाजगी उद्योग व आस्थापनांमध्ये मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. पासून ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वसंतनगर, मुखेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड. संपर्क ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक संर्पक क्र. ०२४६२-२५१६७४ योगेश यडपलवार ९८६०७२५४४८ संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis