पुणे : भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा - रेन्या किकूची
पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। जपानी तंत्रज्ञानाला जगभरात मागणी आहे. भारत आणि जपान यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सौहार्द पूर्ण संबंध आहेत. भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा आहे. अशा प्रतिभावान व्यक्तींसाठी जपान मध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून त्या
पुणे : भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा - रेन्या किकूची


पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। जपानी तंत्रज्ञानाला जगभरात मागणी आहे. भारत आणि जपान यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सौहार्द पूर्ण संबंध आहेत. भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा आहे. अशा प्रतिभावान व्यक्तींसाठी जपान मध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. जपान मध्ये राहण्यासाठी उत्तम सुखसोयी, चांगल्या संधी, उत्तम वेतन मिळते याचा विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, असे मत एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकूची यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) निगडी येथे जपान मधील रोजगार संधी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन किकूची यांच्या हस्ते करण्यात आले. पीसीसीओई मध्ये सलग चौथ्या वर्षी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी जलतापचे संस्थापक सदस्य डॉ. हरी दामले, डीजी फ्युचरटेक इं. प्रा. लि.चे सीईओ आनंद शिरळकर, सूत्र सिस्टीम्सचे मुख्य अभियंता रुपेश मेतकर, एनटीटी डेटा इं. वरिष्ठ मानव संसाधन प्रमुख संजय खोराटे, मोसाइक प्रा. लि. बंगलोर एमडी हिरो इशिदा, प्रोसिड टेक्नॉलॉजीचे समीर लघाटे, स्वाती भागवत, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, आंतरराष्ट्रीय संबंध विभाग अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत आदी उपस्थित होते.

पीसीसीओई मध्ये मागील चार वर्षांपासून जपान मधील शैक्षणिक, रोजगार संधींवर कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित केली जात आहेत. पीसीसीओई मधील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीची ओळख हळूहळू होत आहे.‌ विद्यार्थी देवाणघेवाण उपक्रमांतर्गत मागील वर्षी पंधरा विद्यार्थ्यांनी जपानला भेट दिली. संस्थे मधून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थ्यांना जपान मध्ये रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande