संतांच्या भूमीत मिळालेला पुरस्कार आशिर्वादासारखा – रामदास फुटाणे
पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। आळंदीतील संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला संस्कार दिले. देहू आणि आळंदी ही फक्त तीर्थक्षेत्रे नाहीत,तर मराठी संस्कृतीची संस्कारक्षेत्रे आहेत. तुकाराम-ज्ञानेश्वरांच
mmf


पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। आळंदीतील संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला संस्कार दिले. देहू आणि आळंदी ही फक्त तीर्थक्षेत्रे नाहीत,तर मराठी संस्कृतीची संस्कारक्षेत्रे आहेत. तुकाराम-ज्ञानेश्वरांच्या विचारांनी ही भूमी मराठीची खरी विद्यापीठे आहे. या विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या पिंपरी चिंचवड या कामगार नगरीत मला पुरस्कार मिळतोय,हा माझ्या जीवनातील महत्त्वाचा क्षण असून,हा पुरस्कार मला आशिर्वादासारखा आहे. कामगार नगरीने केलेला सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय पर्वणी आहे,असे उद्गार ज्येष्ठ कवी-साहित्यिक रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय,भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय,चिंचवड यांच्या सहभागातून साजरा करण्यात आलेल्या‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’मध्ये रामदास फुटाणे यांना मानपत्र देण्यात आले. आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महापालिकेच्या वतीने हे मानपत्र प्रदान केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त‘श्यामची आई’चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके यांचा विशेष सन्मान महापालिकेच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर,उपायुक्त अण्णा बोदडे,संदीप खोत,सहाय्यक आयुक्त अतुल पाटील,विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande