बीड - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सारिका क्षीरसागर यांनी साधला संवाद
बीड, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। नवगण शिक्षण संस्थेच्या परळी येथील विज्ञान,कला,वाणिज्य महाविद्यालयात आज विद्यार्थी,पालक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकांनी आपल्या मुलावर योग्य ते संस्कार केल्यास विद्यार्थी हे त्याचे अनुकरण करत असतात. आमच्या सं
अ


बीड, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। नवगण शिक्षण संस्थेच्या परळी येथील विज्ञान,कला,वाणिज्य महाविद्यालयात आज विद्यार्थी,पालक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकांनी आपल्या मुलावर योग्य ते संस्कार केल्यास विद्यार्थी हे त्याचे अनुकरण करत असतात. आमच्या संस्थेची काही जबाबदारी आहे जी आम्ही योग्य प्रकारे,पार पाडू. अशी ग्वाही सारिका क्षीरसागर यांनी दिली.

याप्रसंगी नवगण शिक्षण संस्थेच्या संचालिका सारिका क्षीरसागर यांनी उपस्थित राहुन विद्यार्थी, पालकांशी संवाद साधला.

यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख,मा.जि.प.सदस्य मधुकर आघाव,डॉ.अनिल घुगे, व्ही.टी.देशमाने, आबासाहेब हांगे, बाळासाहेब ठमके, कृष्णा व्यवहारे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande